राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज जमैका आणि सेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स या राष्ट्रांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. कॅरेबियन देशांना भेट देणारे ते पहिलेच भारतीय राष्ट्रपती आहेत. १५ ते १८ मे दरम्यान राष्ट्रपतींचा मुक्काम जमैका मध्ये असून या दरम्यान ते जमैकाचे गर्व्हनर जनरल सर पॅट्रीक अँलन यांच्याशी प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत.
त्याचबरोबर पंतप्रधान अँड्र्यू हॉलनेस तसंच इतर मान्यवरांचीही भेट घेणार आहेत. त्याशिवाय राष्ट्रपती कोविंद, जमैकाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनाही संबोधित करणार आहेत.
भारत आणि जमैका यांच्यातल्या राजकीय संबंधांच्या स्थापनेला यंदा ६० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानंतर १८ ते २१ तारखेपर्यंत राष्ट्रपती, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सला भेट देणार असून गव्हर्नर जनरल सुसान डौगन यांच्याशी चर्चा करणार आहेत.