भारताचा भव्य क्रूज उद्योगात वेग – सर्बानंद सोनोवाल

0
47
भारत भव्य क्रूज उद्योगात वेगानं वाटचाल करत असून या उद्योगात वाढीसाठी आपल्याकडे मोठी क्षमता असल्याचं केंद्रिय बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी म्हटलं आहे. ते आज पहिल्या अतुल्य भारत आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयुषमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या संयुक्तरित्या उद्घाटन करताना बोलत होते.

बंदर, नौकानयन आणि जलमार्ग मंत्रालय तसंच मुंबई बंदर प्राधिकरण आणि भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाने या परिषदेचे आयोजन केले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी आपल्याला एकात्मिक दृष्टिकोन ठेवण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. क्रूज उद्योग देशातला उदयन्मुख उद्योग असल्याचं श्रीपाद नाईक यांनी सांगितलं. दरवर्षी भारतात जगभरातून पर्यटक आकर्षित होत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here