सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टीनं वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याबाबत राज्यसरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी नाशिक विभागात करण्यात येत आहे. या अंतर्गत उत्तर महाराष्ट्रात 1 हजार 659 वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्यात आली. यात शहरी भागातल्या 190 तर ग्रामीण भागातल्या 1 हजार 469 वस्त्यांचा समावेश आहे.
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्णन गमे यांनी बोलावलेल्या समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत ही माहिती देण्यात आली. वस्त्यांची जातीवाचक नावे असल्यामुळे भेदाभेद निर्माण होत असतो त्यामुळे तो दूर करण्यासाठी शासनाच्या समाजकल्याण विभागाने 2020 मध्ये जातीवाचक वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला होता. |