राज्यात विदर्भात उन्हाळा सर्वाधिक असून, उर्वरित महाराष्ट्रात त्या तुलनेत कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. राज्यात काल सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद नांदेड इथं ४३ पूर्णांक ८ अंश सेल्सिअस झाली.
हवामान खात्याच्या उद्याच्या अंदाजानुसार, विदर्भात १२ ते १५ मे दरम्यान काही भागांत उष्णतेची लाट कायम राहील. त्यासाठी पिवळा बावटा जारी केला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील, तर, कोकणात काही भागांत तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.