केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटी इथं झालेल्या एका कार्यक्रमात अनेक सरकारी कार्यालयांच्या संकुलांची पायाभरणी केली. यावेळी, शाह म्हणाले की ईशान्य लोकशाही आघाडीनं भाजपच्या धोरणांमुळे ईशान्येकडील राज्यांमध्ये सरकारं स्थापन केली.
भाजपाला नेहमीच ईशान्येचे प्रश्न सोडवायचे होते, तर काँग्रेसने प्रदेशाचे विभाजन केले अशी टिका त्यांनी केली. भाजपाच्या राजवटीत आसाममध्ये शांतता आणि प्रगती परत आली. आसाम लवकरच पूरमुक्त होईल, असं ते म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे ईशान्य भागातील कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळाली आहे असं सांगून ते म्हणाले की, भाजपाचा केवळ पुरोगामी धोरणांवर विश्वास आहे, फूट पाडणाऱ्या धोरणांवर नाही. आसाम सरकारने गेल्या 1 वर्षात 23 हजार रोजगार उपलब्ध करून दिला अशी माहिती शहा यांनी दिली.