दिल्ली पोलिसांद्वारे बेवारस अत्याधुनिक स्फोटकं नष्ट

0
71
दिल्ली पोलिसांनी काल पूर्व दिल्लीच्या परिसरात असलेल्या गाझीपुर फुल बाजारातून अत्याधुनिक स्फोटकं ताब्यात घेऊन ती नष्ट केली. एका बेवारस बॅगेमध्ये ही स्फोटके ठेवण्यात आली होती.

या बॅगेबद्दल माहिती मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांचं विशेष पथक आणि राष्ट्रीय सुरक्षा गटाच्या बॉम्बनाशक पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत परिसर मोकळा केला आणि स्फोटके ताब्यात घेतली. त्यानंतर एक खोल खड्डा खणून त्यामध्ये स्फोटकांचा नियंत्रित वातावरणात स्फोट घडवून ती नष्ट करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here