पुणे जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांच्या संख्येत लक्षणीय वाढ

0
49
पुणे जिल्ह्यातील बालकांना कोरोना संसर्गाचा मोठा फटका बसला आहे.

परिणामी गेल्या सहा महिन्यांत कुपोषित बालकांचे प्रमाण वाढले असून, सध्या जिल्ह्यात २ हजार ४० कुपोषित बालकांची  नोंद झाली आहे. हीच संख्या जुलै २०२१ मध्ये ६६० होती. मात्र,जुलैपासून आतापर्यंत मात्र सहा महिन्यांच्या काळात कुपोषित बालकांच्या संख्येत तिप्पट वाढ झाल्याचं चित्र चिंताजनक आहे.

यामध्ये सर्वाधिक ८२ अतितीव्र कुपोषित बालके ही खेड तालुक्यातील असून, सर्वांत कमी केवळ आठ बालके ही पुरंदर तालुक्यातील आहेत. तर हवेली तालुक्यात २२५ बालके तीव्र कुपोषित आहेत. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमधील शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण डिसेंबर २०२१ च्या अखेरीस करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here