जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यक्षेत्रात पतपुरवठा करणाऱ्या सोसायट्याना थेट कर्ज पुरवठा करण्यास नाबार्डची मान्यता

0
211
अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यक्षेत्रात पतपुरवठा करणाऱ्या सोसायट्यांना राज्य सहकारी बँकेकडून थेट कर्ज पुरवठा करण्यास राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डने मान्यता दिली आहे.

या निर्णयाचा लाभ संबंधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार असून राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. अडचणीतील जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज पुरवठा होण्यात निर्माण झालेल्या अडचणी या निर्णयामुळं दूर होणार असून सोसायट्याना थेट राज्य सहकारी बँकेकडून कर्ज पुरवठा झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचं वाटप करता येणार आहे.

राज्यातील ज्या ७ ते ८ जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँका डबघाईला आल्या आहेत केवळ त्याच जिल्ह्यांपुरती ही योजना राबवली जाणार असल्याचं अनास्कर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here