राज्यात सध्या २ लाख ६१ हजारांहून अधिक उपचाराधीन कोरोना रुग्ण

0
91
राज्यात सध्या २ लाख ६१ हजारांहून अधिक उपचाराधीन कोरोना रुग्ण आहेत. यापैकी सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण मुंबई, ठाणे ,पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात आहेत.

राज्यात सध्या १९ लाख १० हजार ३६१ रुग्ण गृह विलगीकरणात असून, ९ हजार २८६ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. दिवसभरात काल कोविड-१९ मुळे १९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातला मृत्युदर १ पूर्णांक ९८ शतांश टक्के असून, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९४ पूर्णांक २८ शतांश टक्के आहे. दिवसभरात काल ३३ हजार ३५६ कोरोना रुग्ण बरे झाले, त्यामुळे आतापर्यंत एकंदर बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या ६७ लाख १७ हजार १२५ झाली आहे.

दरम्यान, गेले काही दिवस सातत्याने सर्वाधिक दैनंदिन कोरोनाबाधीतांची नोंद होत असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे जिल्हा परिसरातील रुग्णसंख्या काल दिवसभरात काहीशी कमी झाल्याचं आढळून आलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here