अफगाणिस्तानमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ

0
97

अफगाणिस्तानमध्ये कुपोषण होणाऱ्या बालकांच्या संख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाल्याबद्दल आंतरराष्ट्रीय बचाव समितीनं चिंता व्यक्त केली आहे.

या देशातली सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत ९० टक्के आरोग्य केंद्रं बंद पडण्याची शक्यताही या समितीनं आपल्या अहवालात व्यक्त केली आहे. या अहवालानुसार, या वर्षीच्या अखेरीपर्यंत अफगाणिस्तानच्या ९७ टक्के लोकांना अन्नधान्याची कमतरता जाणवेल, असा इशाराही या अहवालात देण्यात आला असून जगभरातल्या श्रीमंत देशांना मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. आर्थिक आणि राजकीय स्थितीत सुधारणा न झाल्यास लाखो लोकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, असं इथल्या माध्यमांचं म्हणणं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here