भारतीय रिझर्व्ह बँकेला ८ महिण्यात ३ लाख ३ हजार १०७ तक्रारी प्राप्त

0
85

भारतीय रिझर्व्ह बँकेला १ जुलै २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत तीन लोकपाल योजनांतर्गत एकूण ३ लाख ३ हजार १०७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आर बी आय च्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. बँकिंग लोकपाल योजना – २००६, बिगर -बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी लोकपाल योजना -२०१८ आणि डिजिटल व्यवहारांसाठी लोकपाल योजना – २०१९ यांचा या योजनेत समावेश आहे.

तक्रारींचा निपटारा करण्याच्या कालावधीत सुधारणा झाली असून हा दर ९२ पूर्णांक ५२ शतांश टक्क्यांवरून ९६ पूर्णांक ५९ टक्के झाला आहे. डिजिटलायझेशन मुळे ही प्रक्रिया गतिमान झाली आहे. बँकेकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये प्रामुख्यानं एटीएम किंवा डेबिट कार्ड- क्रेडिट कार्ड संबंधित तक्रारी; मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा विषयी तक्रारी तसंच आरबीआयच्या निर्देशांचं पालन न करणं आणि पूर्व सूचना न देता शुल्क आकारणं अशा प्रकारच्या तक्रारींचं प्रमाण अधिक आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here