मकर संक्रांतीनिमित्त आयुष मंत्रालयातर्फे सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकांचं आयोजन

0
42

सूर्यनमस्कारांच महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशानं आज मकरसंक्रांतीचं औचित्य साधून जागतिक स्तरावर आयोजित केलेल्या सूर्यनमस्कार उपक्रमात देशासह जगभरातले एक कोटीहून अधिक नागरिक  सहभागी झाले होते. देशातल्या तसंच परदेशातल्या सर्व नामवंत योग संस्थांच्या योग तज्ञांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय आयुष मंत्रालयानं हा कार्यक्रम आयोजित केला होता.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मार्गदर्शन आणि सूचनेनुसार या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं, असं आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांच्या उत्तम आरोग्याला  केंद्र  सरकारचं  नेहमीच सर्वोच्च प्राधान्य  असून योगासनांमुळे शरीराची लवचिकता आणि रोगप्रतिकार क्षमता  वाढीला लागते, असं ते म्हणाले. योगासनांमधला सूर्यनमस्कार हा प्रकार १२ आसनांचा संच असून याद्वारे  मन आणि शरीर यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here