अवकाळी पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची भिती

0
133

राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस आणि गारठ्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गडचिरोलीत आज सकाळी जोरदार पावसाला सुरूवात झाली. अकोल्यातही रिमझिम पाऊस सुरु झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या पावसामुळे भाजीपाला पिकांना फटका बसण्याची भीती आहे. भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून, अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे  थंडीचा जोर वाढला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परभणी शहरासह परिसरात काल मध्यरात्री सुमारे अर्धा तास पावसानं हजेरी लावली. कोल्हापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. पारा १३ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली आहे. यामुळे पहाटेपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत धुके असतं. पण, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सकाळी उशिरापर्यंत पडणारं दाट धुकं शेतकऱ्यांसाठी चिंताजनक ठरत आहे. रब्बी हंगामातल्या पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यात गारव्यासह ढगाळ वातावरण कायम असल्यानं विविध आजारांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांमध्ये सर्दी, डोकेदुखी इत्यादी लक्षणं असलेल्या रुग्णांची संख्या वाढल्याचं दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here