डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या जनतेला शुभेच्छा – अजित पवार

0
131
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २८ वा नामविस्तार दिन आज विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या जनतेला नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नामविस्ताराच्या निर्णयानं राज्यात स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुत्वाचा विचार अधिक भक्कम केला, असं त्यांनी म्हटलं आहे.

विद्यापीठ नामविस्तारासाठी शहिद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मारकाचं भूमिपूजन कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते आज झालं. विद्यापीठ प्रवेशद्वाराचं नूतनीकरणही केलं जाणार असल्याचं कुलगुरुंनी यावेळी सांगितलं. दरम्यान, नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकर अनुयायी विद्यापीठ प्रवेशद्वारावर अभिवादन करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here