कोविड १९ विरुद्धच्या लढाईत तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी CBSE राष्ट्रव्यापी चळवळ उभारणार

0
102

कोविड १९ विरुद्धच्या लढाईत तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ राष्ट्रव्यापी चळवळ उभारणार आहे.

केंद्रीय क्रीडा आणि आरोग्य खात्याबरोबरच युवा युनिसेफचा सहभागही या उपक्रमात असणार आहे. या संदर्भात सर्व संलग्न संस्थांना लिहीलेल्या पत्रात CBSEने म्हटलंय की १० ते ३० वर्ष वयोगटातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं.

कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुयोग्य वर्तन, लसीकरण याबाबत जनजागृती करणं, आजाराविषयीचे गैरसमज दूर करणं, उपचार आणि सेवांमधे प्रत्यक्ष सहभाग नोंदवणं अशा विविध आघाड्यांवर काम करता येईल.

१० प्रादेशिक भाषांमधे हा उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात विद्यार्थी- शिक्षक मिळून ५० लाख जण सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here