महत्वाच्या घडामोडी
युपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर            एसटी कर्मचाऱ्यांचं थकित वेतन लवकरच मिळणार            देशातले सव्वा बारा लाखाहून अधिक रुग्ण झाले कोरोमुक्त            कोकणात सावित्री, कुंडलिका आणि जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली            मुंबईत पावसाचा जोर ओसरला           

Mar 17, 2020
9:38AM

व्याजदरांमध्ये तत्काळ घट करायला रिझर्व्ह बँकेचा नकार

आकाशवाणी

रिझर्व्ह बँकेच्या येत्या तीन एप्रिलला होणा-या आर्थिक धोरण समितीच्या बैठकीत दरकपातीचे संकेत आज बँकेनं दिले. तसंच रोकड तरलता वाढावी यासाठीच्या उपाययोजना बँकेनं जाहीर केल्या.

अमेरिकेची फेडरल रिझर्व, युरोपची सेंट्रल बँक आणि बँक ऑफ इंग्लंडसह 43 मध्यवर्ती बँकांनी आज दरकपात केल्यानंतर रिझर्व्ह बँकही दरकपात करेल, अशी अपेक्षा आहे.

रुपया सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक 23 मार्चला दोन अब्ज अमेरिकी डॉलर्सची डॉलर रुपया देवघेव करणार आहे, तसंच बाजाराला जेव्हा गरज लागेल तेव्हा दीर्घकालीन रेपो व्यवहारासाठी एक लाख कोटी रुपयांपर्यंतची तयारी ठेवेल, असं बँकेनं सांगितलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.4 29.0
मुंबई 34.0 26.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 36.0 28.0
बेंगलुरू 27.0 20.0