महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:34PM

वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी होत असलेले आरोप फेटाळले

आकाशवाणी
वनमंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी होत असलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले. त्यांनी आज पोहरादेवी इथं भेट देऊन धर्म पिठाचं दर्शन घेतलं त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते.

पूजा चव्हाणचा मृत्यू दुर्दैवी असून चव्हाण कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजा चव्हाण मृत्यूवरून विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत, माझ्यावरचे आरोप चुकीचे आणि निराधार आहेत, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. चौकशीत सर्व गोष्टी स्पष्ट होतील आणि पोलीस तपासातून सत्य बाहेर येईल. माझं राजकीय आणि कौटुंबिक आयुष्य उद्ध्वस्थ करण्याचा प्रयत्न करू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

तर, राठोड सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4