महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:38PM

राज्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा - दादाजी भुसे

आकाशवाणी
राज्यासाठी यंदाच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे केली आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय खतं आणि रसायन मंत्र्यांची भेट घेतली. यावेळी राज्यातल्या शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली.

राज्याला खताचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. गेल्या वर्षी खरीप हंगामात जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता.

यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन २ लाख टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे ४४ लाख ५० हजार टन खत पुरवठ्याची मागणी या भेटीत केंद्र भुसे यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे  केली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4