महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
4:22PM

यंदाच्या आशिया आर्थिक संवादसत्राचं सहयजमानपद पुणे इंटरनॅशनल सेंटर भूषवणार

आकाशवाणी

पुणे इंटरनॅशनल सेंटर यंदाच्या आशिया आर्थिक संवादसत्राचं सहयजमानपद भूषवणार आहे. हे चर्चासत्र २६ तारखेपासून २८ तारखेपर्यंत चालणार असून, परराष्ट्र मंत्रालय त्याचं सहयजमानपद भूषवणार आहे.

सेंटरचे अध्यक्ष डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि निवृत्त राजनैतिक अधिकारी गौतम बंबावाले यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दूरदृश्य प्रणालीद्वारे होणाऱ्या या संवादसत्रात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर सहभागी होणार असून, जपान, ऑस्ट्रेलिया, मालदीव,मॉरिशस आणि भूतानचे परराष्ट्र मंत्रीही त्यात सहभागी होणार आहेत.

याचबरोबर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला, वाणिज्य सचिव अनुप वाधवान आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखलेही यात सहभागी होणार आहेत. पाकिस्तानमधून कोणीही प्रतिनिधी यंदा सहभागी होणार नसल्याचं बंबावाले यांनी सांगितलं,मात्र पुढच्या परिषदांमध्ये ते सहभागी होऊ शकतील असं ते म्हणाले.

कोविडनंतर जागतिक व्यापार आणि अर्थकारणातले आयाम अशी या संवादसत्राची संकल्पना आहे.विविध अर्थतज्ज्ञ, तसंच उद्योगपतीही या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4