महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:25PM

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातली 'सावित्री' 'सॅटलाईट कॉलर' ची पहिली मानकरी

आकाशवाणी
मुंबईत पहिल्यांदाच बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या एका बिबट्याला 'सॅटलाईट कॉलर' लावली आहे. मानव आणि बिबटया संबंध, तसंच मानवी वस्त्यांमध्ये बिबटे वावरताना त्यांची जीवनशैली अभ्यासण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.

सॅटलाईट कॉलर लावलेला बिबट्या मादी असून तिचं नाव 'सावित्री' आहे. पहिल्या टप्प्यात २ बिबटे आणि दुसऱ्या टप्प्यात ३ बिबटे अशा ५ बिबट्यांना 'सॅटलाईट कॉलर' लावली जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी विजय बारब्दे यांनी ही माहिती दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4