महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
8:14PM

मुंबईकरांना २४ तास ऑनलाईन डिलिव्हरी मागवता येणार

आकाशवाणी
कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले असून आठवड्याच्या अखेरीस कडक टाळेबंदी असणार आहे. असे असले तरी मुंबईकरांना ऑनलाईननं खाद्यपदार्थ आणि ई-कॉमर्सच्या वस्तू २४ तास मागवता येणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी बुधवारी याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी केले.

आठवड्याच्या दिवसांत जमावबंदी तर रात्री लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतून फळ विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आल आहे. उपहारगृहांची केवळ पार्सल सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, आठवड्याच्या अखेरीस असलेल्या टाळेबंदीत तेही बंद असेल. या कालावधीत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शुक्रवार ते सोमवारच्या निर्बंधांच्या काळात रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांच्या स्टॉल्सना पार्सल किंवा सुरक्षित अंतर ठेवून विक्री करता येणार असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5