महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
6:06PM

परीक्षा हे आयुष्याचं अंतिम ध्येय समजू नये- प्रधानमंत्र्यांचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना सल्ला

आकाशवाणी
विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात जात असतांना आपले मन शांत आणि ताजेतवाने ठेवावे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या ‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

सर्व प्रकारचे तणाव परिक्षाकेंद्राबाहेर ठेऊन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावं असंही ते म्हणाले. आपली स्मरणशक्ती जुजबी आहे हा विचार विद्यार्थ्यांनी करु नये असंही त्यांनी सांगितलं. मुलांना आकर्षक पद्धतीनं चांगलं जेवण जेवण्याचे शिकवावं, त्याचप्रमाणे घरात भाज्या आणि फळे यांच्या पोषणमूल्यांबाबत चर्चा व्हावी, असंही त्यांनी सांगितलं.

पालकांनी काही खेळ खेळावेत त्याचप्रमाणे त्यांनी पोषण आहाराविषयीच्या गोष्टी आपल्या पाल्यांना सांगाव्यात असंही ते म्हणाले. आपल्या मुलाला त्याच्या ताटात काय वाढलं आहे आणि ठराविक पदार्थ हा कसा बनवला आणि त्यात कोणकोणते घटक असावेत याची माहिती द्यावी असंही त्यांनी सांगितलं.

पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शिकवावे आणि त्यांना चांगले माहितीपट, स्फुर्तीदायक चित्रपट, पुस्तके वाचायला द्यावीत असंही त्यांनी सांगितलं. घरातले चांगले वातावरण मुलांना प्रेरणा देते असंही ते म्हणाले. पालकांनी मुलांबरोबर शिक्षकापेक्षा मित्र म्हणून वागायला हवं, असंही ते म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5