महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
4:41PM

थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन

आकाशवाणी
थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, 'संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण आयुष्य समाज शिक्षणासाठी वेचले. त्यांनी वाईट रूढी-प्रथांना झटकून टाका असे सांगतानाच, माणसाच्या मुलभूत गरजांसह शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा गोष्टींबाबत देखील परखड भाष्य केले आहे. त्यासाठी समाजाला दशसुत्रीही दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांना अभिवादन केलं आहे. यावेळी बोलताना पवार म्हणालेत की,  संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी विचारांचे कृतीशील संत, समाजसुधारक होते. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता, अनिष्ठ रुढी-परंपरांच्या निर्मुलनासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं, संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमीत्तानं राज्यात आज ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

धुळे शहरात आज एक दिवस शहरासाठी, एक दिवस स्वच्छतेसाठी हा उपक्रम सर्व १९ प्रभागांमध्ये राबावला गेला. यात स्थानिक लोकप्रतिनिधींनीही सहभाग घेतला. नांदेड जिल्ह्यात भोकर ग्रामीण रुग्णालयाचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक मुंडे यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

अमरावती इथल्या संत गाडगे बाबा विद्यापीठातही आज गाडगेबाबा यांची जयंती साजरी केली गेली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर आणि कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि त्याला पुष्प अपर्ण केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4