महत्वाच्या घडामोडी
भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन            समाज माध्यमांसाठी जारी केलेल्या नव्या नियमावलीत तंत्रज्ञानाधारीत व्यासपीठांवरच्या मजकूरांवर बंदीची कोणतीही तरतूद नसल्याचे केंद्र सरकारचे स्पष्टीकरण            संत रविदास जयंती देशभर उत्साहात होतेय साजरी            राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन            प्रधानमंत्री उद्या मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी साधणार संवाद           

Feb 23, 2021
7:41PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अन्य महापालिकांमधे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील लागू करावी - रामदास आठवले

आकाशवाणी
डॉ बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजना अन्य महापालिकांमधे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना देखील लागू करावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

केवळ मुंबई महापालिकेतल्या २५ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या सफाई कामगारांना या योजनेतून त्यांच्या मालकी हक्काची घरं देण्याची राज्य सरकारची योजना असून,  म्हाडा द्वारे ती राबवली जाते.

या योजनेची व्याप्ती अन्य महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांसाठी वाढवावी, म्हणून आठवले यांनी ही मागणी केली आहे. यासाठी सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आपण विशेष प्रयत्न करू. त्यासाठी संबधित विभागाशी आपण लवकरच संपर्क साधणार आहोत, असंही ते म्हणाले.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-26 Feb 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.2 15.2
मुंबई 36.0 21.2
चेन्नई 32.2 20.4
कोलकाता 36.3 21.6
बेंगलुरू 33.0 17.4