महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
8:09PM

ग्रामीण भागातल्या घराघरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १ लाख कोटी गुंतवण्याची केंद्र सरकारची योजना

आकाशवाणी
ग्रामीण भागातल्या घराघरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार या आर्थिक वर्षात १ लाख कोटी गुंतवण्याची योजना आखत आहे. आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत ही गुंतवणूक पुढील तीन वर्षांपर्यंत चालेल असं केंद्रिय जलशक्ती मंत्रालयानं म्हटलं आहे. या वर्षाच्या योजनेसाठी उद्यापासून विविध स्तरावर काम सुरु करण्यात येणार असल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे. 

देशातली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या ग्रामीण भागातल्या घराघरात नळजोडणी करण्यासाठी तसचं सुरक्षित पिण्याचे पाणी पोहोचवण्याची ही योजना असेल, असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. 

२०१९ मध्ये आलेल्या जल जीवन मिशन मुळे ग्रामीण भागातल्या ७ कोटी ३० लाख घरांमध्ये नळावाटे पिण्याचे पाणी पोहोचवण्यात आल्याचंही मंत्रालयानं म्हटलं आहे.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5