महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
5:48PM

गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन  

आकाशवाणी
गिरणी कामगार संघर्ष समितीचे नेते दत्ता इस्वलकर याचं काल निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. गेल्या ३ ते ४ वर्षांपासून ते दुर्धर आजारानं त्रस्त होते. मुंबईतल्या जे जे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

२ ऑक्टोबर १९८९ ला गिरणी कामगारांच्या संघर्षाला सुरुवात करून सहकाऱ्यांसोबत गिरणी कामगार संघर्ष समितीची स्थापना केली. गिरणी कामगार संघर्ष समितीचे दत्ता इस्वलकर हे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात १९८८-८९ ला बंद पडलेल्या गिरण्या सुरु झाल्या. 

बंद गिरण्यांच्या जमिनीवर कामगारांना घरं आणि रोजगार मिळाला पाहिजे, म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली गिरणी कामगारांनी संघर्ष केला. त्यांनी गिरण्यांच्या जागेवर आजपर्यंत १५ हजार कामगारांना घरं मिळवून दिली. तसंच गिरण्यांच्या चाळीतल्या रहिवाशांनाही त्यांनी घरं मिळवून दिली.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0