महत्वाच्या घडामोडी
सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन राहील - आरोग्यमंत्री            रेमडेसिवीर इंजेक्शन आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या औषधी घटकांच्या निर्यातीवर केंद्र सरकारची बंदी            राज्यातल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी योग्य ती सुधारणात्मक पावलं उचलण्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्याला सूचना            महात्मा ज्योतिबा फुले य़ांच्या जयंतीनिमित्त त्यांना प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह देशाची आदरांजली            राज्याची लसीकरणाच्या बाबतीत आघाडी कायम           

Apr 08, 2021
5:33PM

कांजूरमार्ग येथील लस साठवणूक केंद्राचं महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उद्घाटन

Twitter
कोरोना लसीकरणाच्या साठ्यासाठी तयार करण्यात आलेलं लस साठवणूक केंद्र हे आगामी ५० वर्षांची गरज पूर्ण करणारं लस साठवणूक केंद्र झालं असून याचा मुंबईची महापौर म्हणून मला अभिमान असल्याचं प्रतिपादन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं.

कांजूरमार्ग (पूर्व) येथील लस साठवणूक केंद्राचं उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब आणि महापौर पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर बोलत होत्या. या लसीच्या साठवणुकीसाठी कांजुरमार्ग (पूर्व) इथल्या परिवार संकुलात एक अत्याधुनिक लस साठवणूक केंद्र निर्माण करण्यात आलं आहे. यासाठी संकुलातले ५ माळ्यांपैकी ३ माळे हे लस साठवणूक केंद्रासाठी महानगरपालिकेतर्फे निश्चित करण्यात आले असल्याचं महापौरांनी सांगितलं. तसंच या केंद्राची  लस साठवणूक क्षमता ही १ कोटी २० लाख एवढी आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 37.2 16.0
मुंबई 33.5 24.0
चेन्नई 34.1 27.4
कोलकाता 36.5 26.2
बेंगलुरू 33.8 21.5