महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
5:50PM

इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय

आकाशवाणी
राज्यातली कोरोनाची स्थिती पाहाता इयत्ता ९ वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेशिवाय पुढच्या वर्गात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल संध्याकाळी या निर्णयाची घोषणा केली.

राज्यातल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या मंडळांच्या परिक्षांबाबतचा निर्णय येत्या काही दिवासात घेतला जाईल, असंही त्या म्हणाल्याचं आमचे प्रतिनिधी कुणाल शिंदे यांनी कळवलं आहे. या परिक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी काही कार्यक्रम आखण्यात येणार असल्याचंही त्या म्हणाल्या.

दरम्यान स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हॉल तिकिटावर आवश्यक असल्यास फिरण्याची परवानगी असेल असं पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितलं आहे. या स्पर्धा परीक्षांसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर एका पालकालाही परवानगी देण्यात आल्याचंही ते म्हणाले.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0