महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Apr 08, 2021
5:25PM

आरबीआयचं धोरणात्मक निवेदन हे विकासावर निश्चित ठसा उमटवणारं असल्याची दिनेश कारा यांची प्रतिक्रिया

आकाशवाणी
रिझर्व्ह बँक ऑफ इंड़िया म्हणजे आरबीआयचं धोरणात्मक निवेदन हे विकासावर निश्चित ठसा उमटवणारं असल्याची प्रतिक्रिया भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष दिनेश कारा यांनी दिली आहे.

आरबीआयचं धोरणात्मक निवेदन हे निश्चित आणि सातत्यपूर्ण तरलतेचा पुरवठा आणि सध्याच्या कोविड लाटेमधून स्पष्ट मार्गदर्शन करून बाजारपेठेतील अनिश्चितता दूर करण्याबाबत ठोस असं आश्वासन आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय, बँकांना गैरबँकिंग वित्तीय संस्थांच्या माध्यमातनं कर्ज देण्यास परवानगी देतानाच, त्यांना पीएसएल मार्गदर्शक तत्वांच्या छत्राखाली आणून कर्जवितरणाचा पाया व्यापक केला आहे. त्यांनी पुढं म्हटलं की, इलेक्ट्रॉनिक वखार पावत्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यामुळे संबंधित उपक्रमांसाठी कर्जाला प्रोत्साहन मिळेल. पेमेंट व्यवस्थेत अनेक पावलं उचलल्यानं डिजिटल व्यवहार आणि स्पर्धेला चालना मिळणार असल्याचंही कारा म्हणाले. मालमत्ता पुनर्रचना समित्यांच्या कार्यप्रणालीचा आढावा घेण्यासाठी समिती नेमल्यानं या प्रकरणांचा झटपट निकाल लागण्याचा मार्ग मोकळा होईल, असंही कारा यांनी म्हटलं आहे. 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0