महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Jan 01, 2020
8:21PM

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळालाही एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ लागू करावी-महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांची मागणी

आकाशवाणी

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाला लागू झालेल्या कर्ज योजनेच्या धर्तीवर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळालाही एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी, महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी राज्यसरकार कडे  केली आहे.ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.

राज्यातला मातंग समाज आर्थिक दृष्ट्या दुर्बल असून भूमिहीन आहे, तसंच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे, त्यामुळे या समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी 2019 पर्यंतचे कर्ज माफ करावे आणि एक लाख रुपयांपर्यंतची थेट कर्ज योजना लागू करावी असं त्यांनी सांगितलं.

नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आलं आहे. कर्जमाफीच्या कार्यवाहीसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

मात्र कर्ज माफीचा लाभ घेण्यासाठी बँक खातं हे आधाराकार्ड क्रमांकासोबत जोडणे आवश्यक आहे, अशी माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी त्यावेळी दिली. योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मेळावे, शिबीरे घेण्याबरोबरच दंवडी पिटवावी तसेच समाज माध्यमाचा उपयोग करावा असंही यावेळी  माने यांनी सांगितलं.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0