महत्वाच्या घडामोडी
अंतिम वर्षाच्या परीक्षा ६० टक्के ऑनलाईन आणि ४० टक्के ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार - उदय सामंत            सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसांत इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ - उध्दव ठाकरे            महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश            कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतकरी स्वतंत्र होणार मात्र विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            रेल्वेतील रिक्त पदं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याचं सरकारचं स्पष्टीकरण           

Dec 27, 2019
5:35PM

लष्करी संबंधाच्या विकासाकरता मोदी आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतासोबत काम करण्याची चीनची इच्छा

आकाशवाणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रयत्नांमुळे भारत आणि चीन यांच्यातले लष्करी संबंध सुधारत आहेत, असं चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी म्हटलं आहे.

ते काल बिजींग इथं बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशांनी धोरणात्मक संवाद कायम राखला असून प्रत्यक्ष सहकार्यही चालू ठेवलं आहे. दोन्ही देशांनी सीमारेषांवर आदानप्रदान मजबूत केलं आहे.

लष्करी संबंधाच्या विकासाकरता मोदी आणि जिनपिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतासोबत काम करण्याची चीनची इच्छा आहे, असं वू यांनी सांगितलं. गेल्या आठवडयात नवी दिल्ली इथं दोन्ही देशांमधे सीमांसंबंधी चर्चेच्या 22 फेर्‍या झाल्या.

सीमाप्रश्नी उचित, सन्मान्य आणि स्वीकारर्ह तोडगा काढण्याचे प्रयत्त्न वाढवण्याबाबत या चर्चांमधे दोन्ही देशांची सहमती झाली आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-18 Sep 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 26.0
मुंबई 32.0 25.0
चेन्नई 33.0 26.0
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 28.0 21.0