महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Dec 22, 2019
11:51AM

इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर आज मायदेशी परतले

आकाशवाणी


इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यानंतर आज मायदेशी परतले. इराणच्या एखाद्या राष्ट्रपतींचा १९ वर्षानंतरचा हा पहीला जपान दौरा आहे. जपान दौऱ्याआधी रुहानी यांनी अनेक जपानी उद्योजकांशी भेटीगाठी केल्या.

आपल्या देशावर अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधांची रुहानी यांनी नींदा केली आणि जपानशी असलेले संबंध आणखी सुधारण्याचे संकेत दिले. रुहानी यांच्याबरोबर जपानच्या दौऱ्यावर गेलेल्या उप परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी जपानच्या राष्ट्रीय प्रसारण मंडळाशी चर्चा केली.

ईराण आणि जपानमधील द्वीपक्षीय संबंध चांगले असून ते अधिक दृढ होण्यात जे अडथळे येत आहेत ते अमेरिकेनं अवैधरित्या लादलेल्या निर्बंधांमुळे येत असल्याचं अराघची यावेळी म्हणाले. जपानशी असलेले द्वीपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची जपानची इच्छा असून चर्चेसाठी इराणची सर्व दारं खुली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0