महत्वाच्या घडामोडी
विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार            कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करणार            वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर            कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतल्या ठेवींवर २०२०-२१ या वर्षासाठी साडेआठ टक्के व्याजदर देण्याची केंद्रीय मंडळाची शिफारस            राज्यात आतापर्यंत १३ लाख ७२ हजार लाभार्थ्यांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण           

Dec 21, 2019
12:00PM

चाबाहार बंदाराच्या विकास आणि व्यवस्थापन कराराच्या अंमलबजावणीबाबत भारत, अफगाणिस्तान आणि इराणच्या अधिकार्‍यांची बैठक संपन्न

आकाशवाणी

इराणमधल्या चाबाहार बंदराच्या विकास आणि व्यवस्थापनासंबंधी 2016 मध्ये झालेल्या कराराच्या अंमलबजावणीबाबत भारत, अफगाणिस्तान आणि इरणच्या अधिकार्‍यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. डिसेंबर -2018 मधे चाबाहराच्या शहीद बेहेष्टी बंदरातून इंडिया पोर्टस ग्लोबल कंपनी लिमिटेडच्या बंदरविषयक कारभारातल्या प्रगतीचं तिन्ही देशांनी स्वागत केल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. संयुक्त सचिव तसंच महासंचालक दर्जाच्या अधिकार्‍यांची नवी दिल्लीत झालेली ही दुसरी आढावा बैठक होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की, संक्रमण, रस्ते, सीमाशुल्क तसचं परराष्ट्र वकीलातीसंबधातल्या राजशिष्टाचारांचा सुयोग्य मेळ घालण्याबाबत या बैठकीत एकमत झालं. चाबाहार बंदरातून 5 लाख टनापर्यंत मालाची हाताळणी यशस्वीरित्या झाली आहे. आढावा समितीची तिसरी बैठक 2020 च्या पहिल्या सहामाहीत होणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-04 Mar 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 30.8 12.2
मुंबई 38.0 19.0
चेन्नई 34.3 21.6
कोलकाता 35.2 19.0
बेंगलुरू 33.0 18.0