महत्वाच्या घडामोडी
अयोध्येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरांचं भूमीपूजन संपन्न            राम मंदिर हे देशाच्या एकतेसाठी महत्त्वाचं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन            अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारली            राज्याच्या अनेक भागात आजही पावसाचा जोर कायम           

Dec 17, 2019
11:36AM

वित्त आयोगासमोर आगामी काळातल्या महसूलाबाबत गंभीर प्रश्न - एन. के. सिंग

आकाशवाणी
 
दिल्लीमधे काल १५ व्या वित्त आयोगाच्या आर्थिक सल्लागार परिषदेची पाचवी बैठक झाली. वित्त आयोगासमोर आगामी काळातल्या महसूलाबाबत गंभीर प्रश्न असल्याचं अध्यक्ष एन. के. सिंग यांनी सांगितलं. या बैठकीत प्रत्यक्ष विकास, चलन वाढ, सध्या होत असलेल्या सुधारणा वस्तू आणि सेवा करासह एकूण कर महसूल, आर्थिक उत्तरदायित्व,

अर्थसंकल्पासंबधी नियमाचं पालन आणि अर्थकारणातली पारदर्शकता यावर सखोल चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. सल्लागार परिषदेला २०२०-२१ सालीसाठीचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत, तसंच वित्त आयोगाला २०२१ ते २६ या कालावधीच्या अहवालाबाबत पुढील कार्यवाही करायला सांगितल्याचंही, सिंग म्हणाले. वित्त आयोगानं २०२०-२१ आर्थिक वर्षासंबधीचा अहवाल अलीकडेच राष्ट्रपती रामनाथा कोंविद यांना सादर केला आहे.    

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-05 Aug 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 37.0 28.0
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 33.0 25.0
कोलकाता 36.0 28.0
बेंगलुरू 26.0 20.0