महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Dec 14, 2019
6:36PM

राज्यांना जी. एस. टी संदर्भात दिलेलं आश्वासन पाळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

आकाशवाणी
जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराची भरपाई देताना केंद्र सरकारकडून  कोणत्याही प्रकारचा भेदभाव तसंच बिगर भाजपा शासित राज्यांवर अन्याय होत नाही असं सांगत केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. केंद्र सरकारनं कोणत्याही राज्याला ऑगस्ट पासून भरपाई दिलेली नाही असं त्यांनी सांगितलं. वस्तू आणि सेवा कराची भरपाई सर्व राज्यांना देण्यासाठी  केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे, अशी ग्वाही सीतारामन यांनी दिली. राज्यसभेत तिसऱ्या  विनियोजन  विधेयकावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना त्या बोलत होत्या. 

 २०१७-१८ च्या  आयजीएसटीच्या थकबाकीसंदर्भात जीएसटी परिषदेनं  विचारविनिमय केला होता. आणि यासंदर्भात आढावा घेण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली होती, असं वित्तमंत्र्यांनी सांगितलं. वित्तमंत्र्यांच्या उत्तरानंतर तिसरं विनियोजन विधेयक लोकसभेकडे परत पाठवण्यात आलं. चालू वित्त वर्षात २१ हजार, २४६ कोटी रुपयांच्या अतिरिक्त सरकारी खर्चाशी संबंधित हे विधेयक आहे. 

 काँग्रेसचे जयराम रमेश, माकपाचे के. के. रागेश, तरूमुळं काँग्रेसचे मनीष गुप्तां यांनी या विधेयकावरील चर्चेत भाग घेतला.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0