महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Dec 05, 2019
5:15PM

‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी घेतला लाभ

आकाशवाणी
‘प्रधानमंत्री मातृवंदन योजने’अंतर्गत मागील वर्षाभरात मुंबईत ७४ हजार २६२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. तसंच अधिकाधिक पात्र व्यपक्तिंना या योजनेचा लाभ मिळावा, याकरता २ ते ८ डिसेंबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जात आहेत. केंद्र शासनाच्याा निर्देशानुसार मे २०१८ पासून मुंबईत ही योजना राबवली जात आहे. 
या योजनेअंतर्गत नवी मुंबईत मातृवंदन सप्ताह होणार आहे. सानपाडा इथल्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात महापालिका आयुक्त  अण्णासाहेब मिसाळ यांनी मातृवंदन योजनेचा लाभ घेणा-या तीन मातांचं अभिनंदन केलं. या योजनेअंतर्गत आठ हजार सातशे एकोणसत्तर लाभार्थ्यांची नोंदणी झाली आहे.
वाशिम जिल्हयातही मातृ वंदन योजना सप्ताह साजरा होत आहे. ही  योजना सध्या ग्रामिण क्षेत्राबरोबरच नगरपालिका,नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रामध्ये लागू आहे. आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 13 हजार 783 एवढया लाभार्थीची नोंदणी झाली आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0