महत्वाच्या घडामोडी
कोरोनावरील लस उपलब्ध करून देताना सर्व राज्यांनी सांघिक भूमिका निभावण्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन            धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल सातशे रुपये देण्यास मंत्रिमंडळची मंजूरी            'नीवार' चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि पुदुचेरीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता            ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणात पुण्यातील संशोधन संस्थेचा आधार            देशातील पीठासीन अधिकाऱ्यांची ८०वी परिषद आजपासून सूरु           

Dec 03, 2019
8:52AM

पीएमसीचे 78 टक्के खातेधारक रक्कम काढू शकतात-निर्मला सीतारामन

आकाशवाणी

पीएमसी बँकेतले 78 टक्के खातेधारक आपल्या खात्यातली रक्कम काढून घेऊ शकतात असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. त्या लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. रक्कम काढण्यासाठीच्या कमाल मर्यादेवर काटेकोर लक्ष असून खातेदारांच्या हितासाठी पुढची पावलं उचलली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

प्रवर्तकांची टाच आलेली मालमत्ता ठरावीक शर्तींवर रिझर्व्ह बँकेला देता येऊ शकते. या मालमत्तेचा लिलाव करुन खातेदारांचे पैसे देता येतील, असं त्या म्हणाल्या. अडीअडचणीसाठी एक लाख रुपये काढता येतील. वैद्यकीय कारण नसेल तर मात्र 50 हजार रुपये खात्यातून काढता येणार आहेत. बँकेशी निगडित तक्रारींबद्दल राज्य पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने चौकशी सुरु केल्याची माहितीही सीतारामन यांनी दिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-25 Nov 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 24.0 09.0
मुंबई 34.0 20.0
चेन्नई 27.0 23.0
कोलकाता 27.0 17.0
बेंगलुरू 28.0 18.0