महत्वाच्या घडामोडी
विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस            देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, सध्या ६१ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर            राज्यात काल ३ हजार ५२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले            जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार           

Nov 23, 2019
1:16PM

कर्ज बुडीत प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनं डी.एच.एफ.एल.ला सल्ला देण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन

आकाशवाणी

भारतीय रिझर्व्ह बँकेनं डी.एच.एफ.एल.च्या प्रशासकाला सल्ला देण्याच्या हेतूनं तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

कर्जबुडव्या प्रकरणांमध्ये ही समिती दिवाळखोरी कायद्यांतर्गत डी.एच.एफ.एल.च्या प्रशासकाची सहाय्यता करणार आहे, तसंच काही बाबतीत सल्लाही देणार आहे.

या समितीत आय.डी.एफ.सी फर्स्ट बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष राजीव लाल, आय.सी.आय.सी.आय प्रुड़ेन्शियल लाईफ इन्श्युरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. कन्नन आणि म्युच्युअल फंड्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन.एस.व्यंकटेश यांचा समावेश आहे.

प्रशासनात होणारे घोटाळे, भांडवलाची कमतरता, कर्जबुडवी प्रकरणं अशा विविध  समस्यांचं निराकरण करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे.                                                   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.2 26.4
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 34.0 28.0
कोलकाता 32.0 26.0
बेंगलुरू 27.0 21.0