महत्वाच्या घडामोडी
देशातील कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६२ पूर्णांक ४२ शतांश टक्क्यांवर            मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात १४३ अंकांची घसरण            आसीएसई मंडळाच्या इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर            राज्यात आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोरोनामुक्त            राज्यातील ७२ पोलीसांचा कोरोनामुळे झाला मृत्यू           

Nov 15, 2019
8:43PM

केंद्र सरकारची जाणीवपूर्वक २०१८ मधे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण

आकाशवाणी

राफेल विमान खरेदी प्रकरणी गुन्हा दाखल करावा लागेल, म्हणूनच केंद्र सरकारनं जाणीवपूर्वक २०१८ मधे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली, असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं संपूर्ण वाचन न करताच केंद्र सरकार क्लीनचिट मिळाल्याचा दावा करत आहे, असंही ते म्हणाले. लोकसेवकांकडून राफेल खरेदीमधे भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती याचिकेत दिली होती. एफआयआर दाखल करणं गरजेचं असल्याचंही त्यात नमूद केलं होतं, असंही ते म्हणाले. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-11 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 38.3 23.9
मुंबई 31.0 24.0
चेन्नई 34.2 24.5
कोलकाता 35.0 28.0
बेंगलुरू 27.0 20.0