महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Nov 02, 2019
9:07PM

निर्भया निधीचा उपयोगानं देशातल्या सर्व जिल्ह्यांत मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र उभारणार

आकाशवाणी
निर्भया निधीचा उपयोग करुन देशातल्या सर्व जिल्ह्यात मानवी तस्करी प्रतिबंधक केंद्र आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज ट्विटवरुन जाहीर केला आहे. 

महिलांमधे सुरक्षेची भावना बिंबवून महिला सुरक्षेचं बळकटीकरण करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर केंद्र सरकारनं २०१३ साली निर्भया निधीची स्थापना केली होती.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था आणि केंद्र सरकारच्या उपक्रमांसाठी हा निधी सहाय्यकारी ठरतो.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0