महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Nov 03, 2019
10:14AM

विविध नेत्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

आकाशवाणी
अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात पावसानं झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केली. मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहाणार नाही यासाठी पंचनामे करताना अधिका-यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. विखे यांनी थेट शेतात जावून या गंभीर परिस्थीतीबाबत चिंता व्यक्त केली.

शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही आज अकोला जिल्ह्यात पावसानं फटका बसलेल्या शेतीची पाहणी केली, आणि शेतक-यांशी संवाद साधला. अकोला जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे चणा, सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनीही आज जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. मदत मिळवून देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करु, असं आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिलं. 

लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आज निलंग्यात जावून पीक परिस्थितीचा आढावा घेतला, आणि तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.

वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपण उभं असून, जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना देवून, शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्याची मागणी करणार असल्याच आश्वासन  पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पाहणी दौ-यात शेतकऱ्यांना दिलं.

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज ममुराबाद, विदगाव इथं भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0