महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Nov 01, 2019
5:58PM

नागरिकांचे मूलभूत हक्क जपण्यासाठी खासगीपणाचा भंग करणार्‍या कृत्यांविषयी स्पष्टीकरण करण्याचे व्हॉटस ‍अॅपला निर्देश

आकाशवाणी
खासगीपणासह नागरिकांचे मूलभूत अधिकार जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं. नागरिकांच्या खासगीपणाचा भंग करणार्‍या कोणत्याही मध्यस्था विरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रवी शंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. व्हाटसअॅप वर होणा-या खासगीपण भंगाच्या प्रकरणांवर सरकार फार चिंतीत असल्याचं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. हे रोखण्यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत, असं सरकारनं व्हाटस अॅपला विचारलं आहे.

या संदर्भात व्हाटस अॅपला सोमवार पर्यंत उत्तर देण्यास सांगितलं आहे. इस्रायलच्या हेरगिरी करणा-या संस्थेनं पेगासस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतीय वार्ताहर आणि मानवी हक्क कार्यकर्ते यांची हेरगिरी केल्याचं उघडकीस आलं आहे. त्यानंतर हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जातंय.

इस्रायलच्या पेगाससच्या माध्यमातून राजनेता, मुत्सद्दी, पत्रकार आणि सरकारी अधिकारी अशा जागतिक स्तरावर जवळपास १ हजार ४०० लोकांवर पाळत ठेवली जात असल्याचं व्हाटस अॅपनं म्हटलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0