महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Oct 25, 2019
1:20PM

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलच्या प्रवर्तकला न्यायालयीन कोठडी

आकाशवाणी
चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांच्या पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचा प्रवर्तक राकेश वधावन आणि त्याचा मुलगा सारंग यांना मुंबईच्या एका न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांना काल मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.

त्यावेळी त्यांना न्यायालयान कोठडी सुनावण्यात आली. या दोघांना गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली होती.

पीएमसी बँकेच्या व्यवस्थापनानं, एचडीआयएल या कंपनीचं मोठ्या प्रमाणावर थकित असलेलं कर्ज लक्षात येऊ नये म्हणू कंपनीच्या कर्जाच्या 44 खात्यांच्या जागी 21 हजार 49 बनावट खाती दाखवली होती असा पोलिसांचा आरोप आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4