महत्वाच्या घडामोडी
सुयोग्य पद्धतीनं सर्व राज्यांना प्राणवायुचा पुरवठा करण्याच्या प्रधानमंत्रींच्या सूचना            कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            कोविड नियंत्रणासाठी राष्ट्रीय धोरण तयार करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक           

Oct 19, 2019
9:52AM

पीएमसी बँक घोटाळ्यातल्या तीन आरोपींना २३ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी

आकाशवाणी
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातल्या तीन आरोपींना मुंबईतल्या न्यायालयानं, येत्या 23 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. एच.डी.आय.एलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राकेश वाधवान, त्याचा मुलगा सारंग, आणि पीएमसी बँकेचे माजी अध्यक्ष वर्यम सिंग या तिघांना काल महानगर दंडाधिकारी एस जी शेख यांच्यापुढं हजर करण्यात आलं.

त्यानंतर सक्तवसुली संचालनालयानं मनीलाँड्रिंग कायद्याखाली वाधवान पिता-पुत्रांना ताब्यात घेण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानं त्यांना आवश्यक औपचारिकता पूर्ण करायला सांगत कामकाज तहकूब केलं, आणि पुढची तारीख दिली.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4