महत्वाच्या घडामोडी
विविध विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याची तज्ञ समितीची शिफारस            देशभरात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर, सध्या ६१ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर            राज्यात काल ३ हजार ५२२ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले            जागतिक बँक आणि केंद्र सरकार यांच्यात ७५ कोटी अमेरिकी डॉलर्सचा करार           

Oct 19, 2019
11:43AM

केंद्र सरकारची कांदा, डाळी, खाद्य तेल, तेलबियांच्या घाऊक व्यापाऱ्यांसोबत नियमित बैठक घेण्याचा राज्यांना सूचना

आकाशवाणी
केंद्र सरकार सर्व राज्यांना कांदा, डाळी, खाद्य तेल आणि तेलबियांच्या घाऊक व्यापारी, आयातदार आणि निर्यातदारांबरोबर नियमितपणे बैठक घेण्याची सूचना देणार आहे. या बैठका राज्य आणि जिल्हा पातळीवर विशेषतः सणासुदीच्या हंगामात डिसेंबरपर्यंत आयोजित करायला सांगितलं जाईल. आवश्यक खाद्यवस्तूंची साठेबाजी आणि सट्टेबाजीवर देखरेख ठेवण्यासाठी स्थापन गटाच्या कालच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील राज्यांची पोलीस समिति साठेबाजीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आवश्यक कारवाई करण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियमित बैठका घेईल. देशभरात डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी योग्यवेळी धोरणात्मक उपाययोजना केल्या जातील.

या बैठकीला कृषि  आणि शेतकरी कल्याळण मंत्रालय, गुप्तहेर विभाग, दिल्ली पुलिस, नाफेड,परराष्ट्र व्यापार महासंचालनालय, परराष्ट्र मंत्रालय आणि दिल्ली सरकारचे प्रतिनिधि उपस्थित होते.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-07 Jul 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 36.2 26.4
मुंबई 29.0 25.0
चेन्नई 34.0 28.0
कोलकाता 32.0 26.0
बेंगलुरू 27.0 21.0