महत्वाच्या घडामोडी
मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध            FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर           

Oct 19, 2019
11:45AM

संरक्षण दलांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यात भारताचा लैकिक : राजनाथ सिंह

आकाशवाणी
क्षेपणास्त्र संशोधन आणि विकासासाठी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानामुळेच भारत 'क्षेपणास्त्रांचं देशान्तर्गत उत्पादन करू शकणाऱ्या देशांच्या' मांदियाळीत जाऊन बसला"- अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डॉ.कलामांप्रती आदरभावना व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्लीत डी.आर.डी.ओ. अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संचालकांच्या परिषदेत बोलत होते.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीनं डीआरडीओनं भारताला सक्षम केलं आहे, असंही ते म्हणाले. अनेक अटी आणि बंधनं, मर्यादित संसाधनं आणि वेळेची कमतरता असूनही, डीआरडीओनं विविध प्रणाली, उत्पादनं आणि तंत्रं विकसित करून संरक्षण दलांच्या सामर्थ्यात वाढ केली आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं.

तंत्रज्ञानाविषयक आव्हानं यशस्वीपणे पेलणा-या युवा संशोधक आणि स्टार्टअप ना संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते ‘कलाम डेअर टू ड्रीम’ पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. विशेष तंत्रज्ञानामुळे देशाच्या सुरक्षेत वाढ होते असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सांगितलं. तंत्रज्ञान हे गरजा पूर्ण करण्यासाठी असावं तसंच प्रतिकूलतेवर मात करण्याकरता आपली संरक्षण दलं आणि गुप्तचर संस्थांच्या सहकार्यानं आपण आपल्या गरजांचं योग्य आकलन करायला हवं, असं ते म्हणाले.


संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देशांतर्गत उपाययोजनांचा वापर सुनिश्चित करत असल्याबद्दल लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी DRDO चं कौतुक केलं. भविष्यातल्या युद्धजन्य परिस्थितीशी सामना करण्यासाठीच्या यंत्रणासोबतच सायबर स्पेस लेसर, इलेक्ट्रॉनिक तसंच रोबोटिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांच्या विकासाकडे लक्ष द्यायला हवं, असं रावत यांनी सांगितलं.

अमेरिकेच्या संरक्षणविषयक आधुनिक संशोधन प्रकल्प संस्थेसारख्या संस्थांचा अभ्यास करुन विशेष तंत्रज्ञान विकसित करण्याला चालना मिळायला हवी, असा सल्ला नौदल प्रमुख करमबीर सिंग यांनी दिला. 
 

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0