महत्वाच्या घडामोडी
कारखान्यांच्या ठिकाणी कोविड दक्षता समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना            विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा मृत्यू            देशात कोरोनाबाधितांच्या संख्येतली दैनंदिन वाढ प्रथमच ३ लाखाहून अधिक            केंद्रीय मार्ग निधीतून राज्यातील २०४० कोटींच्या २७२ रस्ते प्रकल्पांना मंजुरी           

Oct 19, 2019
12:10PM

पीएमसी बँकेच्या खातेदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू : निर्मला सीतारमण

आकाशवाणी
पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक प्रकरणावर सरकारचं बारीक लक्ष असून, खातेदारांचे पैसे त्यांना परत मिळवून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. त्या आज नवी दिल्लीत, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होत्या.

ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत, पीएमसी बँकेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन रिजर्व बँकेनं दिल्याचंही त्यांनी सांगितलं. बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून, बँकांकडे पुरेशा प्रमाणात रोखी उपलब्ध आहे असंही त्या म्हणाल्या. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-17 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.0 18.2
मुंबई 35.0 26.0
चेन्नई 34.3 28.4
कोलकाता 35.5 26.5
बेंगलुरू 33.0 22.4