महत्वाच्या घडामोडी
वाढत्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक सुरु            मुंबईत आज आणि उद्या खाजगी लसीकरण केंद्र वगळता सरकारी लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरुच राहणार            राज्यात विविध ठीकाणी विकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद            निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचा प्रचार शिगेला, बंगालमध्ये आज नरेंद्र मोदींच्या 2 प्रचार सभा            वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यात वाढते निर्बंध           

Oct 12, 2019
8:30PM

जपानमधे हजीबिस चक्रीवादळामुळे मोठं नुकसान

आकाशवाणी
जपानमधे आलेल्या हजीबिस चक्रीवादळामुळे जपानच्या अनेक भागांत सोसाट्याच्या वा-यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. टोकयोच्या नैऋत्य भागात इझू पेनिनसुला इथं जपानी वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजण्याआधी भूस्खलन झाल्याचं वृत्त आहे.

पूर आणि भूस्खलनाच्या भितीमुळे सुमारे 70 लाख लोकांना आपली घरं सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला आहे. रेल्वेसेवा पूर्णपणे बंद असून हजाराहून अधिक विमानोड्डाणं रद्द केली आहेत. रग्बी विश्वचषकाचे आजचे नियोजित सामने तसंच जपानी ग्रांप्रीची फॉर्म्युला-1 स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

जपानमधे 60 वर्षानंतर आलेलं हे दुसरं मोठं चक्रीवादळ असून जपानी हवामान संस्थेनं येत्या 24 तासात टोकयो क्षेत्रात 50 सेटींमीटर पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-09 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 36.0 18.0
मुंबई 34.0 24.0
चेन्नई 34.0 25.0
कोलकाता 35.0 26.0
बेंगलुरू 36.0 20.0