महत्वाच्या घडामोडी
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना देशाचं अभिवादन            राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह राज्यातल्या नेत्यांनी चैत्यभूमीवर जाऊन वाहिली आदरांजली            देशाचं नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण, जागतिक मापदंडांच्या अनुरूप आणि अत्याधुनिक असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन            सीबीएसई इयत्ता १० वी ची परीक्षा रद्द, तर १२ वी ची परीक्षा पुढे ढकलण्याचा केंद्रसरकारचा निर्णय            कोविड रुग्णांवरील उपचारात वापरल्या जाणाऱ्या रेमडेसीवीर या औषधाचं उत्पादन वाढवण्यास केंद्रसरकारची मंजुरी           

Oct 12, 2019
8:40PM

भारत आणि जपान मध्ये १९ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान संयुक्त लष्करी कवायती

आकाशवाणी
भारत आणि जपान मध्ये १९ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर संयुक्त लष्करी कवायती होणार आहेत. धर्म गार्डियन या नावानं दोन आठवडे चालणाऱ्या या कवायतीत  एकमेकांच्या सहकार्यातून  संयुक्तपणे दहशतवादासह अन्य सुरक्षा आव्हानांना कसं समोर जावं, याचा युद्धाभ्यास देखील केला जाणार असल्याचं दिल्ली इथून जारी केलेल्या सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

या कवायतींमध्ये दोन्ही देशातले प्रत्येकी२५ सैनिक सहभागी होतील. वेगवेगळ्या दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये दोन्ही देशांना आलेले अनुभव या युद्धाभ्यासा दरम्यान सामायिक केले जातील, असंही या पत्रकात नमूद केलं आहे.

हा युद्धाभ्यास वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षांपासून सुरु झाला आहे.  या युद्धाभ्यासात जंगल आणि शहरी भागातल्या दहशतवाद विरोधी अभियानातल्या प्लाटून स्तरावरील संयुक्तं प्रशिक्षणाचा समावेश आहे,असंही नमूद केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-14 Apr 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 40.2 20.6
मुंबई 33.2 27.0
चेन्नई 35.4 27.0
कोलकाता 40.1 27.4
बेंगलुरू 33.0 21.0