महत्वाच्या घडामोडी
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षण मतदार संघांच्या निवडणूकांची मतमोजणी सुरु            नव्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा            देशातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५ लाखांच्या वर            देशातल्या प्रमुख तपास संस्थांच्या कार्यालयासह पोलीस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे सर्वोच्च न्यायालायाचे आदेश            राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार           

Oct 12, 2019
1:17PM

भारत कॉमोरोसला ऊर्जा, सागरी संरक्षण क्षेत्रात साठ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत कर्ज देईल : एम व्यंकय्या नायडू

आकाशवाणी
भारत, कॉमोरोसला ऊर्जा आणि सागरी संरक्षण क्षेत्रामधे 60 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स पर्यंत कर्ज देईल, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. ते काल कॉमरोसची राजधानी मोरोनी इथं पूर्व आफ्रीका देशांच्या संसदेत बोलत होते. दोन्ही देशांनी ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामधे महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षर्‍या केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मोरोनी इथं 18 मेगावॅटचे ऊर्जानिर्मिती केंद्र उभारण्यासाठी साडे एकेचाळीस दशलक्ष अमेरिकन डॉलर, तर लढाऊ बोटींसाठी 20 दशलक्ष डॉलर्सचं कर्ज देण्यात येणार आहे. कॉमरोस राष्ट्राचा अत्यंत प्रतिष्ठेचा नागरी पुरस्कार ‘द ऑर्डर ऑफ द ग्रीन क्रिसेन्ट’ या पुरस्कारानं नायडू यांना सन्मानित करण्यात आलं. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-03 Dec 2020
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 8.2
मुंबई 35.0 23.0
चेन्नई 26.6 23.9
कोलकाता 29.0 16.0
बेंगलुरू 26.0 17.0